डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आज ‘राष्ट्रीय लसीकरण दिन’

आज देशभर राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जात आहे. लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी  दरवर्षी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. १९९५ साली याच दिवशी प्रथमत: देशातून पोलिओ निर्मूलनासाठी  तोंडाद्वारे लस द्यायला सुरुवात झाली होती.

 

देशातल्या प्रत्येक बालकाचं रोगसंसर्गापासून संरक्षण करण्याच्या हेतूनं लसीकरण आवश्यक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या कामी आरोग्य मंत्रालयासह  राज्य सरकारं आणि आरोग्य विभागातले कर्मचारी वचनबद्ध असल्याचं या संदेशात नमूद केलं आहे.

 

देशभर लसीकरण होण्याच्या दृष्टीनं २०२४ ला मिशन इंद्रधनुष अभियानाची सुरुवात केली असून बालमृत्यूचं प्रमाण कमी करणं आणि लसीकरण मोहिमेला गती देणं हा याचा उद्देश आहे.

 

निरोगी आयुष्याचे करुया रक्षण लसीकरणाने मिळेल संरक्षण, या जागृती संदेशाद्वारे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटंबकल्याण, पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समाजमाध्यमांवर माहिती सामाईक केला आहे.