केंद्र सरकारनं राज्यातल्या ३ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दिन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे.
डॉ. शेख नांदेडमधल्या अर्धापूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर जगदाळे लातूरच्या दयानंद कॉलेजात शिकवतात. कपूर या मुंबईतल्या अणूऊर्जा महामंडळाच्या शाळेत शिक्षिका आहेत. ५० हजार रुपये आणि रजत पदक असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.