डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 29, 2025 1:26 PM | National Sports Day

printer

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जात आहे. क्रीडा दिनाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून प्रधानमंत्र्यांनी ज्येष्ठ हॉकी खेळाडू मेज ध्यानचंद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

आजही युवा पिढ्यांना मेजर ध्यानचंद यांच्यापासून प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. देशातील खेळाडूंना पाठबळ देणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि भारताला उत्कृष्ट क्रीडांचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र सरकार यासाठी वचनबद्ध असल्याचं ही प्रधानमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. 

 

मेजर ध्यानचंद यांचे कठोर परिश्रम अद्वितीय असून ते देशातील हॉकीसह इतर क्रीडांसाठी प्रेरणादायी असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

 

केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनीही राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्तानं नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच क्रीडा दिवसाचं औचित्य साधत देशात तीन दिवसांचा क्रीडा महोत्सव साजरा केला जात असल्याचं मांडविय यांनी सांगितलं. खेळांना प्रोत्साहन देणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण व्हावी, यासाठी या महोत्सवाचं आयोजन केल्याचंही त्यांनी सांगितलं.