राष्ट्रीय सिकलसेल मिशन अंतर्गत एकूण ६ कोटी व्यक्तींची सिकलसेल आजारासाठीची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी दोन लाख १५ हजार व्यक्तींना या आजाराचे निदान झाले आहे आणि १६ लाखांहून अधिक वाहकांची ओळख पटवण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते,मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांनी त्यांच्या लक्ष्यांच्या तुलनेत लक्षणीय प्रगती दर्शविली आहे. निदान झालेल्या प्रकरणांची सर्वाधिक संख्या ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये नोंदवली गेली आहे.
Site Admin | July 23, 2025 9:57 AM | National SickleCell Mission
राष्ट्रीय सिकलसेल मिशनअंतर्गत ६ कोटी व्यक्तींची सिकलसेल आजारासाठीची तपासणी