खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून ८० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

गैरसरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर एनपीएसमधून ६० ऐवजी ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढून घेता येईल. उर्वरित २० टक्के रक्कम ॲन्युईटी योजनेत गुंतवावी लागेल. यासंदर्भातले नियम पीएफआरडीए अर्थात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं जारी केले आहेत. एनपीएस खात्यात जमा असलेली रक्कम ८ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर खातेधारकांना एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने पूर्ण रक्कम काढून घेता येईल. नव्या नियमांनुसार एनपीएस खात्यातल्या रकमेच्या बदल्यात वित्तीय संस्थांकडून कर्ज काढता येईल. PFRDA नं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एनपीएसमधून बाहेर पडण्याचं कमाल वय आता ७० वरुन वाढवून ८५ केलं आहे.