डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात

राष्ट्रीय पोषण सप्ताह आजपासून देशभरात सुरू होत आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे सन १९८२पासून दरवर्षी १ ते ७ सप्टेंबरदरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो. पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं, सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या सप्ताहादरम्यान भर दिला जातो. या कालावधीत अनेक चर्चासत्रं, कार्यशाळा, शैक्षणिक उपक्रम, परिषदा, जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.