डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची मध्यप्रदेश तसंच तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांना नोटीस

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दोन वेगवेगळ्या प्रकरणांची स्वतःहून दखल घेत मध्यप्रदेश तसंच तेलंगणाचे पोलिस महासंचालकांना नोटीस पाठवली आहे. मध्यप्रदेशात भिंड जिल्ह्यात दोन पत्रकारांच्या बाबतीत पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीबाबत प्रेस क्लबने काढलेल्या निवेदनाची स्वतःहून दखल घेत मानवाधिकार आयोगाने मध्यप्रदेशच्या पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. 

 

   हे प्रकरण सामंजस्यानं सोडवल्याचं सांगणारा विडीयो तयार करण्यासाठी या पोलिसांनी दबाव आणल्याचंही या निवेदनात म्हटल आहे त्याबाबत आयोगाने आठवड्याभरात स्पष्टीकरण मागवलं आहे. 

 

हैदराबादेत एका रिक्षावाल्याला पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं तेलंगणाच्या पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा