राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज करण्यात येणार प्रदान

केंद्रसरकारच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय महामार्ग सर्वोत्तम पुरस्कार आज नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात तसच त्याची कायम गुणवत्ता राखून देखभाल करताना उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे . तसच या निमित्ताने दिवसभर विविध चर्चासत्र आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले असून, त्यात महामार्ग बांधणीत आलेले नवे तंत्रज्ञान, डोंगराळ भागात महामार्ग बांधण्याची आव्हाने तसच जागतिक स्तरावरील महामार्ग बांधणीची गुणवत्ता आणि भारतीय महामार्ग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची क्षमता आदी विषयांचा यामध्ये समावेश आहे .

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.