डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मनी लाँड्रिगप्रकरणी सोनिया गांधी यांना नोटीस जारी

नॅशनल हेरॉल्ड कथित मनी लाँड्रिगप्रकरणी दिल्लीच्या रोऊज एव्हेन्यू न्यायालयानं काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज नोटीस जारी केली. सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिग प्रतिबंधक कायद्याखाली ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल का घेऊ नये, याची कारणं स्पष्ट करायला न्यायालयानं सांगितलं आहे. 

 

या प्रकरणी ईडीनं तक्रार नुकतीच न्यायालयात दाखल केली, त्यावर नोटीस जारी करायला विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी गेल्या आठवडयात नकार दिला आणि त्यातल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रं सादर करावीत, असं ईडीला सांगितलं होतं.