देशातल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवाद असण्याची गरज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी आणि पंजाब, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल राज्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मंत्री जाधव यांनी नॅशनल हेल्थ मिशनची बैठक दिल्लीत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नॅशनल हेल्थ मिशनचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी परिश्रम घेण्याचं आवाहन जाधव यांनी अधिकाऱ्यांना केलं.
Site Admin | September 25, 2024 7:44 PM
आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संवादाची गरज – राज्यमंत्री प्रतापराव जाधव
