केंद्रीय पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पशुधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू केले जातील. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची पुरवठा साखळी सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम करणे आणि शेतकरी तसंच ग्राहक दोघांचाही फायदा होईल अशी माल साठवण आणि सेवा सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
सर्वोत्कृष्ट देशी पशुपालक शेतकरी पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्रातले कोल्हापूरचे अरविंद यशवंत पाटील आहेत.