राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये ‘राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार-२०२४’ प्रदान केले. भूविज्ञान क्षेत्रातला हा सर्वात जुना आणि मानाचा पुरस्कार असून भूविज्ञान क्षेत्रातल्या तज्ञांची वचनबद्धता आणि उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो, असं पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करताना राष्ट्रपती म्हणाल्या. मानवी संस्कृतीच्या विकासात खनिजांनी महत्वाची भूमिका बजावली असून उद्योगांसाठी पाया रचला आहे, हे देखील राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं.
Site Admin | September 26, 2025 2:21 PM | National Geology Awards
‘राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण