September 23, 2025 8:25 PM

printer

४ मराठी बालकलाकारांसह आशिष बेंडे, सुजय डहाके, ‘शामची आई’ चित्रपटही पुरस्कारानं सन्मानित

७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत विज्ञान भवन  इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार  ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमाला मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘जवान’ साठी शाहरूख खान आणि ‘ट्वेल्थ फेल’ साठी विक्रांत मस्सी यांना विभागून देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या सिनेमातल्या भूमिकेसाठी राणी मुखर्जी यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणासाठी ‘आत्मपँफ्लेट’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांना सुवर्ण कमळ मिळालं. तर मराठीतला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला ‘शामची आई’. ‘श्यामची आई’ साठीचा पुरस्कार अमृता राव यांनी स्वीकारला, दिग्दर्शक सुजय सुनील डहाके यांना दिग्दर्शकाचं रजत कमळ मिळालं. राष्ट्रीय चित्रपट महामंडळाच्या ‘लेंटीना आओ’ या चरित्रात्मक माहितीपटाला, तसंच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला ‘फ्लॉवरिंग मॅन’ या माहितीपटासाठी पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट बालकलाकारांमधेही ४ मराठी बालकलाकारांचा समावेश होता. ‘नाळ – दोन’ ला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळाला. मेघना गुलजार यांना ‘सॅम बहादूर’ चित्रपटासाठी विशेष मूल्य विभागात पुरस्कार मिळाला.