राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करणार आहेत. मल्याळी चित्रपट अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना जवान या चित्रपटासाठी तर विक्रांत मेस्सी यांना 12वी फेल या चित्रपटासाठी प्रदान करण्यात येईल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी प्रदान करण्यात येईल. सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार 12वीं फेल या चित्रपटाला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार द केरला स्टोरी साठी सुदीप्तो सेन यांना तर रॉकी और रानी की प्रेम कहानी ला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित असतील.