डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ला पाच वर्षं पूर्ण

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू होऊन आज पाच वर्षं झाली. देशातल्या शाळांची एक इमारत ही ओळख बदलून केवळ पुस्तकी शिक्षण, गुण आणि पाठांतर यांच्या पलिकडील ज्ञान मिळवण्याचं अवकाश अशी ओळख घडवण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा पथदर्शी आराखडा आहे. गेल्या पाच वर्षांत या धोरणामुळे अधिक समावेशक, विद्यार्थी केंद्रित आणि भविष्यासाठी अनुकूल शिक्षण पद्धतीचा पाया रचला गेला आहे. सर्व राज्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात नवीन धोरणाचा प्रभाव दिसून येत आहे. निपुण भारत आणि विद्या प्रवेश या उपक्रमांचा ४ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. बाल वाटिका, जादुई पिटारा आणि प्रशस्त ऍप या उपक्रमांमुळे बहुभाषी, समावेशी आणि समग्र शिक्षणाला प्रोत्साहन मिळत आहे. मुली आणि विशेष गरज असलेल्या मुलांना मदत, भारतीय भाषांना प्रोत्साहन तसंच क्षेत्रिय विभाजन कमी करण्याचे प्रयत्न याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं ध्येय साध्य करण्याची संधी देणारं हे नवीन शैक्षणिक धोरण आहे.