वीस्लॉ झेपीवस्की स्मृती क्रीडा स्पर्धेत भारताच्या तेजस्विन शंकर यानं डीकॅथलॉन प्रकारात दुसऱ्यांदा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. पोलंड इथं काल झालेल्या सामन्यात त्यानं ७ हजार ८२६ गुण मिळवले आणि याआधीचा ७ हजार ६६६ गुणांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. डीकॅथलॉनमध्ये या प्रकारात धावणं, उंच उडी, गोळाफेक, अडथळ्यांची शर्यत अशा दहा प्रकारांचा समावेश असतो.
Site Admin | July 28, 2025 2:35 PM | National Decathlon Record | Tejaswin Shankar
डीकॅथलॉन प्रकारात भारताच्या तेजस्विन शंकरचा नवा राष्ट्रीय विक्रम
