प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होत आहे. राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे.
या परिषदेत सहा विशेष सत्रं आयोजित करण्यात आली. यानुसार राज्यांमधील नियमनमुक्ती, प्रशासनातील तंत्रज्ञान – संधी, धोके आणि निवारण, स्मार्ट पुरवठा साखळी आणि बाजारपेठ जोडणीसाठी ॲग्रीस्टॅक, एक राज्य, एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या मुद्द्यांवर भविष्यातली धोरणं निश्चित करण्यावर चर्चा झाली.
या परिषदेत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले आहेत.