डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राष्ट्रीय महिला आयोगाचे राज्य सरकारला चौकशीचे निर्देश

ठाण्यातल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, बलात्कार, गर्भपात आणि वेश्याव्यवसायाची जबरदस्ती झाल्याच्या माध्यमांमधल्या बातमीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याच्या चौकशीचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. आरोपीला पॉक्सो कायद्याखाली त्वरित अटक करावी आणि कृती अहवाल येत्या तीन दिवसात सादर करावा असे निर्देश राज्य पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तसंच पीडित मुलीला मदत देऊन पुनर्वसन करावं असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.

 

उत्तरप्रदेशात गाझियाबादमध्ये महिलेवर झालेल्या ऍसिड हल्ल्याच्या घटनेचीही  आयोगाने दखल घेतली असून चौकशीचे निर्देश दिले आहेत.