राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा

राष्ट्रीय महिला आयोगाने तरुण संशोधकांसाठी शक्ती पाठ्यवृत्तीची घोषणा केली आहे. महिलांच्या प्रश्नांशी संबंधित धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याच्या दृष्टीने संशोधन करू इच्छिणाऱ्या २१ ते ३० वर्षे वयोगटातल्या भारतीय नागरिकांना ही पाठ्यवृत्ती दिली जाईल. ही पाठ्यवृत्ती सहा महिन्यांसाठी असून  त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत आवेदन करता येईल, असं आयोगाने म्हटलं आहे.