डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या आणखी ६ जातींना मागासवर्गीयांच्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगानं राज्यातल्या आणखी सहा जाती केंद्राच्या इतर मागासवर्गिय सूचीत सामिल करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. कुलवंत वाणी, कुणबी वाणी, कराडी, कानोडी किंवा कनाडी, नेवेवाणी, सलमानी, तसंच निषाद – मल्ला – मल्लाह किंवा नाविक या सहा जातींचा समावेश केंद्राच्या सूचीत करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं आयोगाकडे पाठवला होता. त्यावर गेल्यावर्षी १७ ऑक्टोबरला तसंच यावर्षी २६ जूनला मुंबईत आयोगानं जनसुनावणी घेतली त्यात सर्व कागदपत्र योग्य आढळल्यानं केंद्र सरकारला ही शिफारस केली असल्याचं राष्ट्रीय मागासर्ग आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.