दहावा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस आज साजरा करण्यात येत आहे. ‘आयुर्वेद प्रत्येक मानवासाठी; आयुर्वेद पृथ्वीसाठी’ अशी यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आज 10 वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवसानिमित्त मुख्य कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी आयुर्वेद क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
Site Admin | September 23, 2025 9:16 AM | National Ayurveda Day
आज, १०वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस
