डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 3, 2025 1:37 PM

printer

WAVES मधे येरला वाणी कम्युनिटी रेडियो केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार

कम्युनिटी रेडिओच्या देशभरात सुरु असलेल्या कार्याची, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी प्रशंसा केली आहे. ते आज वेव्हज् परिषदेत कम्युनिटी रेडिओच्या उदघाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सर्व कम्युनिटी रेडिओ काही उद्दिष्टांनी चालवली जात असून त्यामुळे आपल्या परंपरांना प्रोत्साहन मिळत आहे असं ते म्हणाले. दहाव्या राष्ट्रीय कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांचं वितरण मुरुगन यांच्या हस्ते यावेळी झालं. नवोन्मेष श्रेणीत राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कम्युनिटी रेडिओच्या कामकाजातून समर्पण आणि वचनबद्धता प्रतीत होत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.