नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहापदरी महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. 374 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी 19 हजार 142 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा ग्रीनफिल्ड मार्ग वाढवण बंदराजवळ दिल्ली-मुंबई महामार्गाला, नाशिकमध्ये राष्ट्रीय महामार्गावर आग्रा-मुंबई कॉरिडॉरला आणि पांगरी इथं समृद्धी महामार्गाला जोडण्याचं प्रस्तावित आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यामुळे प्रवासाचा 17 तासांचा वेळ वाचणार असून 201 किलोमीटर अंतर कमी होण्याची अपेक्षा आहे. नाशिक- अक्कलकोट मार्गामुळे औद्योगिक परिसरात येणाऱ्या -जाणाऱ्या मालाची दळणवळण क्षमता वृद्धिंगत होणार आहे.