डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामं पुढची २५ वर्षं टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. नाशिकमध्ये पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री फडनवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.

 

येत्या काळात कुंभमेळ्याच्या कामांमधून नाशिक आधुनिक होणार आहे तसेच तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून या शहराचा विकास करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी या विकासकामांविषयीची माहिती दिली. 

 

नाशिकचा कुंभमेळा स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कुंभमेळ्यासाठी लागणाऱ्या साधुग्रामच्या जागेचं कायमस्वरूपी भूसंपादन करायला प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. या कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसंच अन्य मान्यवरही उपस्थित होते. 

 

या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रामकुंड परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली तसंच राम काल पथ या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.