नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून निफाडमध्ये ८ अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवलं गेलं. नाशिक शहरात आज १० पूर्णांक १ दशांश अंश सेल्सीअस इतकं तापमान नोंदवलं गेलं. काल १० पूर्णांक ३ अंश सेल्सीअस किमान तापमानाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे कमाल तापमान देखील कमी झालं आहे. त्यामुळे गारठा वाढला आहे.
गेल्या २४ तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Site Admin | November 16, 2025 7:02 PM
नाशिकमध्ये पारा आणखी घसरला असून निफाडमध्ये ८ अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमानाची नोंद