डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 15, 2025 7:46 PM | Nashik

printer

Nashik : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी आज नाशिकमधे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यसरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची महिनाभरात अंमलबजावणी करावी अशी मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली. राज्यात गेल्या २ महिन्यात २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून हे चित्र भयावह आहे असं ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे देखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मागणी मान्य झाली नाही तर राज्यभर मोर्चे काढण्यात येतील असा इशारा शरद पवार यांनी दिला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.