डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 10, 2025 3:32 PM | CBI | Nashik

printer

नाशिकमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा CBI कडून पर्दाफाश

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेल्या एका बेकायदेशीर कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे. मेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरुन ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केलेे जात होते. गिफ्ट कार्ड तसंच क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतले फोनकॉल अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशांच्या नागरिकांना करुन त्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. आरोपींनी साठ जणांना या सेंटरवर कर्मचारी म्हणून नेमलं होतं. सीबीआयने तपासादरम्यान ४४ लॅपटॉप आणि ७१ मोबाईल फोन जप्त केले. तसंच महागड्या गाड्या, सोनं आणि भरपूर प्रमाणात रोकडही जप्त केली.  

सर्वाधिक वाचले

सर्व पहा