December 15, 2025 5:56 PM | Nashik

printer

नाशिकमध्ये हरित कुंभाचा उत्साह

पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरीत कुंभ साजरा केला जाणार आहे. त्यासाठी नाशिक परीसरात १५ हजाार रोपं लावून मोठी वनराई तयार केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडं आणली आहेत. हरीत कुंभसाठी नाशिककरांनी देखील योगदान द्यावं, असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं. तपोवनातली वृक्षतोड ही साधुग्रामसाठी करावी लागेल. त्याला वृक्ष प्रेमींनी पर्यावरणीय अंगानं विरोध केला तर त्यांना विश्वासात घेतलं जाईल, मात्र, साधु महंताविषयी अपमानकारक शब्द सहन केले जाणार नाहीत, असा इशारा महाजन यांनी दिला. 

 

दरम्यान, नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या निमित्तानं हेाणाऱ्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज महाकवी कालीदास मंदिर इथं दुपारी झाला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.