December 8, 2025 10:48 AM | nashik accident

printer

नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या सप्तशृंगी देवी गडाजवळ मोटार दरीत कोसळून सहा जण ठार झाले आहेत. काल संध्याकाळी हा अपघात घडला. गडाच्या संरक्षक कठड्याची भिंत तोडून ही मोटार सुमारे हजार फूट खाली खोल दरीत कोसळली. अपघातातील सर्व मृत व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावातील रहिवासी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.