नाशिक तालुक्यातल्या शिलापूर इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानच्या परीक्षण प्रयोगशाळा म्हणजेच सी पी आर आय चं उद्घाटन आज केंद्रीय उर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थिती होणार आहे.
शंभर एकर क्षेत्रात साकारलेली ही प्रयोगशाळा महाराष्ट्रच नव्हे तर गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यातल्या उद्योजकांना उपयुक्त ठरणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.