August 11, 2025 7:00 PM | Nashik

printer

नाशिकमध्ये ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ या मोहिमेचा प्रारंभ

‘सण महाराष्ट्राचा- संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेचा प्रारंभ आज नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेते, हॉटेल्स, आणि तत्सम व्यवसायिकांकडून खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेल, दूध, तूप आदी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घ्यावेत, आणि तपासणीत त्रुटी आढळून आली तर संबंधित व्यवसायिकावर कारवाई करावी, अशा सूचना मंत्री झिरवाळ यानी यावेळी दिल्या.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.