April 16, 2025 3:49 PM | Nashik

printer

नाशिक शहरात मध्यरात्री दगडफेक, २१ पोलीस जखमी

नाशिक शहरातल्या द्वारका परिसरात काल रात्री जमावानं दगडफेक केल्यामुळे २१ पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या तीन वाहनांचंही नुकसान झालं आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमाराला परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं. या परिसरात बेकायदेशीर दर्गा बांधकामाला हटवण्याचं काम सुरू होतं. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर आज सकाळी दर्ग्याचं बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती नाशिक महापालिकेनं दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.