डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 11, 2025 8:22 PM | ISRO | NASA

printer

नासा, इस्रो यांनी विकसित केलेला रडार उपग्रह पुढच्या महिन्यात प्रक्षेपित होणार

नासा आणि इस्रो यांनी संयुक्तपणे विकसित केलेला सिंथेटिक ऍप्रोच रडार उपग्रह पुढच्या महिन्यात प्रक्षेपित केला जाण्याची शक्यता आहे.  इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी आज इंफाळमधल्या केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना ही माहिती दिली.  

 

हा रडार उपग्रह म्हणजे एक संयुक्त पृथ्वी-निरीक्षण अभियान असून यामध्ये दोन प्रमुख पेलोड्स आणि मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे.  त्यापैकी एका पेलोडची निर्मिती भारतानं तर दुसऱ्याची अमेरिकेनं केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.