महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा विजय झाला. महामंडळाच्या सतरा जागांसाठी १४ नोव्हेंबरला मतदान झालं होतं, आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात झिरवाळ आणि गावित यांच्या पँनलचे सर्व उमेदवार विजयी झाले.
आदिवासी विकास मंत्री हे या महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर, याच खात्याचे राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात. या महामंडळाचे भाग भांडवल जवळपास दोन हजार कोटी आहे.