December 26, 2025 1:26 PM | New Delhi | PM

printer

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला आज प्रारंभ

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांची बैठक आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली सुरु होत आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला प्रधानमंत्री  उद्या आणि परवा संबोधित करतील. राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.

 

या वर्षी  या परिषदेचा मुख्य विषय ‘विकसित भारतासाठी मानवी भांडवल’ असा असून यात राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या विषयांतर्गत प्रामुख्यानं शालेय पूर्व शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण तसंच क्रीडा आणि अतिरिक्त उपक्रम या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.