डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार

नंदुरबारमध्ये अक्कलकुवा तालुक्यातल्या देवगुई घाटात शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून दोन विद्यार्थी ठार झाले, तर ५०पेक्षा जास्त विद्यार्थी जखमी झाले. दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेले आदिवासी समुदायाचे विद्यार्थी या बसमधून आश्रमशाळेत परतत होते. मात्र चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस खोल दरीत कोसळली. स्थानिकांनी दरीत उतरून विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. जखमी असलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यापैकी २ ते ३ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.