November 3, 2024 3:57 PM | Nandurbar Accident

printer

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात भरधाव जीपनं दिलेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. काल रात्री उशीरा नंदुरबार ते धानोरा रस्त्यावर लोय पिंपळोद गावाजवळ हा अपघात झाला. रस्त्याच्या कडेला नादुरुस्त दुचाकीजवळ उभ्या असलेल्यांना भरधाव गाडीनं धडक दिली. यात १२ ते ४० वर्ष वयोगटाल्या पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला नंदुरबार इथं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती, आमच्या वार्ताहरानं दिली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.