डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 25, 2024 7:08 PM | Nanded

printer

नांदेड रेल्वे स्थानक आगामी काळात देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक होईल – राज्यमंत्री रवनीत सिंग

नांदेडचं रेल्वे स्थानक हे येत्या कालावधीत सर्व सोयीसुविधांनी युक्त असलेलं देशातलं सर्वोत्तम रेल्वे स्थानक करण्यात येईल, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंघ यांनी म्हटलं आहे. गुरुद्वारा शहीद बाबा भुजंग सिंघजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पंच तख्त साहिबांच्या दर्शनाची विशेष रेल्वे यात्रा सुरु करण्यात आली आहे. आज नांदेड इथून रवनीतसिंघ यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं, त्यानंतर ते बोलत होते.

 

तेराशे भाविकांना घेऊन ही यात्रा नांदेड इथून पटना, दिल्ली, अनंतसाहिब फतेहगड साहिब सरहंद, दमदमा साहिब भटींडा, दरबार साहिब अमृतसर इथं पोहोचणार आहे. सहा सप्टेंबर रोजी ही यात्रा पुन्हा नांदेडला पोहोचणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.