August 27, 2024 1:44 PM | Vasantrao Chavan

printer

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर आज दुपारी नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव रणजीत चव्हाण यांनी अग्नी दिला. नांदेडचे  पालकमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, तसंच मराठवाड्यातले इतर खासदार यावेळी उपस्थित होते.