डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 16, 2025 7:03 PM | Accident | Nanded

printer

नांदेड वाहन अपघातात ४ जणाचा मृत्यू, १६ जखमी

उत्तर प्रदेशात बाराबंकी इथं पूर्वांचल एक्सप्रेस वे वर आज पहाटे झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले.
नांदेडहून आयोध्येला जाणाऱ्या भाविकांची ही टेंपो ट्रॅव्हलर गाडी, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त बसला धडकून हा अपघात झाला. प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर ३ जण उपचारादरम्यान मरण पावले. अपघातात मरण पावलेले चौघेही नांदेड जिल्ह्यातले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे.