नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातल्या चरणमाळ घाटात एकाच दिवशी दोन ट्रक उलटून अपघात झाले. मालेगावहून सुरतला म्हशीची रेडकं घेऊन जाणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळला. त्यात २६ रेडकं दगावली. गंभीररीत्या जखमी झालेल्या चालकाला प्रथमोपचार देऊन पुढच्या उपचारांसाठी रुग्णालयात नेलं.
त्याच घाटात काही तासांपूर्वी आंध्रप्रदेशातून सुरतकडे संत्री घेऊन जाणारा ट्रक ब्रेकमधे बिघाड झाल्यानं उलटला होता. चालकाला किरकोळ दुखापत झाली.