आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सोडवावा – नाना पटोले

आरक्षणाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन सोडवावा, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. 

आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपानं मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करुन सामाजिक एकोप्याला बाधा पोहचवली जात आहे. आरक्षणाचा निर्णय सत्तेत बसलेल्या लोकांना घ्यायचा असताना विरोधी पक्षांनाच ते त्याबद्दल विचारत आहेत. वास्तविक हे काम केंद्र सरकारचं असून त्यांनीच हा निर्णय घ्यावा असल्याचं पटोले यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.