November 8, 2024 6:58 PM | Nana Patole

printer

प्रधानमंत्री, गृहमंत्री जाती-धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची पटोलेंची टीका

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना पराभव दिसत आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाती आणि धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत केली. 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत जाती धर्माच्या नावावर माथी भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा मोदी-शाह यांचा प्रयत्न जनता खपवून घेणार नाही असं पटोले म्हणाले. जाती धर्माच्या उतरंडी ही मनुवादी भाजपाची संस्कृती असून जातींमध्ये भांडणं लावण्याचं पाप त्यांनीच केलं आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.