डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 13, 2024 7:24 PM | Nana Patole

printer

भाजप राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा पटोले यांचा आरोप

भाजपाचे नेते राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज यवतमाळ जिल्ह्यात प्रचारसभेत बोलत होते. महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं,मात्र सध्या सोयाबीन केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये दराने खरेदी केलं जात आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही. ही शेतकऱ्याची फसवणूक आहे, अशी टीका पटोले यांनी केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कापूल, सोयाबीन पिकाच्या हमीभावात वाढ करू, असं आश्वासन पटोले यांनी यावेळी दिलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.