बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा नाना पटोले यांचा आरोप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली संबधित शाळा भाजपा आणि आरएसएस विचारांची असल्यानं पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत वार्ताहर  परिषदेत बोलत होते. शाळेच्या संस्था चालकांवर दबाव आणून १२ आणि १३ तारखेचे सीसीटीव्ही फूटेज गायब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. २४ तारखेला महाविकास आघाडीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.