नक्षली संघटनेच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य रामाधर माज्जी याच्यासह बारा नक्षलवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड विभागातल्या नक्षली चळवळीला यामुळे मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. रामाधर माज्जी याच्यावर एक कोटीचं इनाम होतं. एके ४७ रायफलसह रामाधरने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.
Site Admin | December 8, 2025 1:25 PM
एक कोटीचं बक्षीस असलेल्या नक्षली नेत्यासह बारा नक्षलवाद्यांचं छत्तीसगडमधे आत्मसमर्पण