अरुणाचल प्रदेशचे मुख्य सचिव मनिष कुमार गुप्ता यांनी आज थायलंडमधले भारताचे राजदूत नागेश सिंग यांच्याशी दूृरदृश्य पद्धतीनं चर्चा केली. यावेळी राज्य सरकार च्या वतीनं ऑर्किड फुलांच्या लागवडीबाबत थायलंडकडून, गुंतवणूक, लागवडीचं साहित्य, त्याचप्रमाणे तांत्रिक आणि व्यावसायिक माहितीसाठी कशाप्रकारे सहकार्य घेता येईल.
या बद्दल चर्चा झाली. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात ऑर्किडच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्यासाठी थायलंडमधल्या भारतीय दूतावासाची मदत घेतली जाणार आहे.