डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागपूरमधे हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे उठवली, मात्र पोलीस बंदोबस्त कायम

नागपूरमधे गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज दुपारी ३ वाजल्यापासून संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले.

 

गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतिनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यापैकी काही भागातली संचारबंदी २० मार्चला, तर आणखी काही भागातली संदारबंदी काल उठवली. उर्वरित भागातली संचारबंदीही आज दुपारी ३ वाजल्यापासून उठवण्याचे आदेश पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिले. संवेदनशील भागात स्थानिक पोलिसांची गस्त सुरु राहील. तसंच बंदोबस्तही कमी होणार नाही असं सिंघल यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.