सांस्कृतिक कार्यक्रमांना हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे ‘ कन्व्हेन्शन सेंटर’ उभारण्यात येणार आहे. याप्रकल्पासाठी स्पेन मधल्या फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे ‘कन्व्हेन्शन सेंटर’ साठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूरचा इतिहास ‘कन्व्हेन्शन सेंटर’ ला भेट देणाऱ्या प्रत्येकाला समजावा, अशा पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी, असं ते म्हणाले.
मुंबई हे भारताचंच नव्हे, तर दक्षिण आशियाचे ‘पावर हाऊस’ बनत आहे. त्यामुळे महाराष्ट्रसोबत काम करायला स्पेन उत्सुक असल्याचं राजदूत जुआन अँटोनियो यांनी सांगितलं.