नागपूरात आज ओबीसी संघटनांनी महामोर्चा आयोजित केला होता. कुणबी जातीच्या व्यक्तींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातला २ सप्टेंबरचा शासन आदेश रद्द करावा अशी त्यांची प्रमुख मागणी होती. मोठ्या संख्येने ओबीसी नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. नागपुरात यशवंत चौकातून सुरू झालेला मोर्चा संविधान चौकात संपुष्टात आला. त्यानंतर तिथे सभा घेण्यात आली.
Site Admin | October 10, 2025 3:27 PM | Nagpur
नागपुरात ओबीसी संघटनांचा महामोर्चा
